बेळगाव : आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमी प्रेरणास्थान ठरत आहे.
अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेले अक्कतंगेरहाळ येथील हर्षा सत्तिगेरी सध्या Qatar Airways मध्ये कार्यरत आहेत. ही कामगिरी स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
हर्षा सत्तिगेरी यांनी स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीमधून आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित एअरलाइनमध्ये काम करण्याची संधी मिळवली. त्यांच्या या यशामुळे अकॅडमीतील प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
हर्षा यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीचे एमडी विनोद बामणे म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्याने प्रशिक्षण पूर्ण करून Qatar Airways सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत काम करत असल्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना दिशा देत मेहनत आणि सातत्याने पुढे जावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
हर्षा सत्तिगेरी यांची यशोगाथा विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
