Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*साठ वर्षांचा प्रश्न निकाली! बुधवार पेठ कॉर्नरचा चेहरामोहरा बदलणारे नगरसेवक नितीन जाधव*

बेळगाव :
बेळगाव शहरातील बुधवार पेठ कॉर्नरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकत नगरसेवक नितीन जाधव यांनी एक ऐतिहासिक काम करून दाखवले आहे. गेल्या साठ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाकडून शेण आणि इतर कचरा टाकला जात होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणीही ठोस पाऊल उचलले नव्हते.

मात्र, नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत गवळी समाजाशी संवाद साधला. चर्चेअंती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि त्या ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात आले. भिंतीवर आकर्षक चित्रकला करण्यात आली असून, नागरिकांसाठी बसण्याची सोय (बेंचेस) देखील करण्यात आली आहे.

https://youtu.be/3hyAAB0duSY

या बदलानंतर बुधवार पेठ आणि टिळकवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक जाधव यांचे कौतुक केले आहे. जाधव यांनी देखील गवळी समाजाचे मनःपूर्वक आभार मानले.

या उपक्रमाच्या वेळी संतोष पाटील, दीपक हरदी, हर्षद कलघटगी, आनंद कबाडी, समीर गवळी, चेतन बेटगेकर, सुभाष भवानी, प्रमोद पोटे, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष्मण मोहिते आणि गजानन मुळीक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्य दोन्ही वाढले असून, नागरिकांकडून हा प्रयत्न "खऱ्या अर्थाने जनसेवा" म्हणून गौरवला जात आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*