Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*संगमेश्वरनगर दागिने चोरीप्रकरणात सहा महिने उलटले*

बेळगाव :
संगमेश्वरनगर परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या तब्बल ७५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील तपास ठप्प असल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने पुन्हा एकदा केला आहे.

मीना लालचंद चौहान आणि त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी गुरुवारी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तपासात होत असलेल्या विलंबाबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

चौहान कुटुंबाने 5 जून 2025 रोजी बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक 60/2025 दाखल केला होता. तथापि, “वारंवार पाठपुरावा करूनही तपासात कोणतीही अर्थपूर्ण प्रगती झालेली नाही,” असा आरोप संजय चौहान यांनी केला.

तपासादरम्यान स्वतःचे पूर्ण सहकार्य करूनही “वारंवार आश्वासने, अपमानास्पद वर्तन आणि धमक्या मिळत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांच्या वृद्ध आई मीना चौहान यांनी माध्यमांशी बोलताना केला.

याशिवाय, त्यांच्या घरात काम करणाऱ्या शाहूनगर येथील गंगा राठोड यांनी झोपेच्या गोळ्या देऊन दागिने लंपास केले असल्याचा आरोपही मीना चौहान यांनी केला.

कुटुंबाने बेळगाव पोलिस आयुक्त, डीसीपी गुन्हे, डीसीपी कायदा-सुव्यवस्था आणि एसीपी यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीलाही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

“छोट्या छोट्या कामासाठी पोलिसांनी आम्हाला अनेकदा बोलावले, आम्ही सहकार्यही केले. परंतु प्रकरण सोडवण्याऐवजी दुर्लक्षित केले जात आहे. या निष्काळजीपणामुळे आम्ही मानसिक त्रास सहन करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कठोर निर्देश द्यावेत,” अशी मागणी चौहान कुटुंबाने केली.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*