LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

सतीश जारकीहोळींना उपमुख्यमंत्रीपदाची संधी? काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी

बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावाची उपमुख्यमंत्रीपदासाठी गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात पुढे येत आहे. मात्र, याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्यातील विविध सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणांचा विचार करून अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदांची निर्मिती करण्याबाबत काँग्रेसमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशी राजकीय विश्लेषकांची मते आहेत.
सतीश जारकीहोळी यांनी गेल्या काही वर्षांत संघटनात्मक पातळीवर प्रभावी कामगिरी केली आहे. बुद्ध, बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, तसेच अहिंदा (अल्पसंख्याक, हिंदू मागासवर्ग आणि दलित) मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे काँग्रेस हायकमांड सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची चर्चा आहे.
बेळगाव जिल्ह्याला यापूर्वी भाजप सरकारच्या काळात लक्ष्मण सवदी यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याला ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, राज्यातील नेतृत्वासंदर्भातील अनिश्चितता दूर झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासह उपमुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत असले तरी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*