LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना*

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना.

बेळगाव ता,13. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे.
हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले होते, आता यांची झारखंड येथे 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 69 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संत मीराचा फुटबॉल संघ विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात वेगा हेल्मेट ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाप्पा बिडी व सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पवार यांच्या हस्ते दोन्ही मुलींच्या फुटबॉल संघांना फुटबॉल किट प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार , उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार ,शामल दड्डीकर पौर्णिमा बाळेकाई यांच्या समवेत संघ रवाना झाला आहे. या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष महादेव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नायक यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

या 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघात कर्णधार निधीशा दळवी उपकर्णधार समीक्षा खन्नुरकर ,गोलरक्षक अनन्या रायबागकर ,समृद्धी घोरपडे, प्रणिती बडबंजी, हर्षिता गवळी, कनिष्का हिरेमठ, आदिती सुरतेकर, कृतिका हिरेमठ ,समृद्धी कोकाटे , पूर्वा बडमंजी, आरोही देसाई,सर्व बेळगाव, प्रणय्या शेट्टी ,मौल्या श्री पी, मंगळूर,तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार दीपा बिडी , उपकर्णधार श्रेया लाटुकर ,सृष्टी सातेरी ,अमृता मालशेय, हर्षदा जाधव ,सृष्टी येळ्ळूरकर ,संचिता सुतार, मोनिता रिंग, दीपिका रिंग ,सिंचना तिगडी ,श्रद्धा भंडारगळी सर्व बेळगाव प्रतिक्षा शेट्टी, लक्ष्या सी, मौल्या एस, खुषी करकेरा, देविका अल्वा, तश्मया जोगी, सर्व मंगळूर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*