बेळगाव ता, 29 गाजियाबाद उत्तर प्रदेश येथील सरस्वती विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक विद्यालय दुर्गाव दुर्गवती हेमराज शाळेच्या मैदानावर होणाऱ्या 37 व्या विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे अथेलेटिक्स खेळाडू रवाना झाले आहेत.
1 ते 4 नोव्हबर दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे खेळाडू संचित धामणेकर लांब उडी,भावना बेर्डे लांब उडी व तिहेरी उडी मेघा कलखाबकर 3000 मी धावणे या प्रकारात भाग घेणार आहे हे खेळाडू प्रशिक्षक शिवकुमार सुतार यांच्या समवेत रवाना झाले आहेत या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व पालक वर्गांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.
नुकत्याच हैदराबाद येथे झालेल्या क्षेत्रीय विद्याभारती क्रीडा स्पर्धेत संचित, भावना, व मेघा यांनी विविध क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते.खेळाडूंचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

