LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*संदीप पाटील यांनी उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी पद स्वीकारले*


बेळगाव येथे उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला.

राज्य सरकारने पंधरा दिवसांपूर्वी संदीप पाटील यांच्यासह अन्य काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी रखडली होती. बुधवारी नव्याने आदेश जारी करण्यात आल्यानंतर बदली प्रक्रिया पूर्ण झाली.

नवीन आदेशानुसार संदीप पाटील यांनी केएसआरपी डीआयजीपी पदाचा कार्यभार सी. के. बाबा यांच्याकडे सोपवून उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी म्हणून जबाबदारी स्वीकारली.

गुरुवारी सायंकाळी झालेल्या पदभार स्वीकृती कार्यक्रमात बेळगावचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन तसेच पोलिस विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. चेतनसिंग राठोड हे आता सीआयडीचे आयजीपी म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*