Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सागर कोलकर यांच्यावर धार्मिक परिषदेची जबाबदारी; गोकाकमध्ये आदेशपत्राचे वितरण*

बेळगाव जिल्हा धार्मिक परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांना आदेशपत्रे वितरित करण्याचा कार्यक्रम गोकाक शहरातील मंत्री सतीश जारकीहोळी गृहकचेरीत पार पडला. यावेळी सागर कोलकर यांची जिल्हा धार्मिक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

नवनियुक्त सदस्यांना युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी तसेच मंदिरांच्या संवर्धनासाठी नवनियुक्त सदस्यांनी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय दत्त्ती अधिनियम, 1997 तसेच त्यातील 2011 मधील दुसऱ्या दुरुस्तीच्या तरतुदींनुसार बेळगाव जिल्हा धार्मिक परिषदेची नव्याने रचना करण्यात आली आहे.

3 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही परिषद चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत कार्यरत राहणार आहे.

धार्मिक स्थळांचा विकास, मंदिरांचे संरक्षण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि धार्मिक संस्थांशी संबंधित कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार आहे.

या पार्श्वभूमीवर सागर कोलकर यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*सागर कोलकर यांच्यावर धार्मिक परिषदेची जबाबदारी; गोकाकमध्ये आदेशपत्राचे वितरण**रस्त्याच्या मधोमध उघडे ड्रेनेज; अपघाताची टांगती तलवार!**चार वाहनांतून 200 भाविक पंढरपूरला रवाना; निलजीची भक्तीची परंपरा कायम**अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा*