Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*पहाटेपासून सफाई युद्ध; बेळगावात 1 टन प्लास्टिक कचरा हटवला*

बेळगाव : प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ कॅन्टोन्मेंट परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने बुधवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवत तब्बल 84 स्वच्छता कर्मचाऱ्यांना मैदानात उतरवले. पहाटे 6 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

एमएलआयआरसीचे कमांडंट तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोजच्या घराघरातील कचरा संकलनासोबतच रस्ते, गटारे, फूटपाथ, शाळांच्या परिसरातील झुडपे, विजेचे खांब आणि सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा हटवण्यात आला.

विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार आणि काही नागरिकांकडून निष्काळजीपणे फेकण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल प्लेट्स आणि इतर कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. सफाई मोहिमेदरम्यान इस्लामिया शाळेजवळील परिसरात काळी जादूशी संबंधित साहित्यही आढळून आले. त्यामुळे परिसरात अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरण तयार झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली.

मोहीमेदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलून ट्रकद्वारे विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर पाण्याच्या टँकरद्वारे परिसर धुऊन स्वच्छ करण्यात आला तसेच रोगराई रोखण्यासाठी डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आली. विशेषतः शाळा परिसर आणि मासळी मार्केट भागात मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत जवळपास 1 टन प्लास्टिक कचरा जमा करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिली. पावसाळ्यात प्लास्टिकमुळे गटारे तुंबून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करून स्वच्छतेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना १ जूनला अभिवादन; मराठी बांधवांना उपस्थितीचे आवाहनस्कायवर्ड अकॅडमीतील विद्यार्थिनीची बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवर निवड*बेळगावच्या ३ वर्षीय नवतेजचा जागतिक विक्रम**मराठी विद्यानिकेतनला माजी विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षक यांची उदार देणगी**पहाटेपासून सफाई युद्ध; बेळगावात 1 टन प्लास्टिक कचरा हटवला**कटकॊळ पोलिसांची धडक कारवाई; ८ मोबाईल चोर जेरबंद**कर्नाटकात मोठी राजकीय उलथापालथ? सिद्धरामय्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग*कुलूप तोडून दागिने लंपास करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात*शिवानंद नीलण्णावरकडून मर्सिडीज गिफ्ट? बेळगावात नवा खुलासा**शिवाजीनगरमध्ये आमदार निधीतून आधुनिक जिमचे उद्घाटन*