LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा ‘संपत्ती निर्मिती’ परिसंवाद उत्साहात

बेळगाव | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे "संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला" या विषयावर माहितीपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर डॉक्टर तसेच एका चार्टर्ड अकाउंटंटचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट या दोन्ही व्यावसायिकांच्या समाजातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यानंतर क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी सचिवीय अहवाल सादर करत आगामी सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
सत्कार समारंभात डॉ. शोभा कारिकट्टी, डॉ. स्मिता गुडगणट्टी, डॉ. स्मृती प्रधान, डॉ. कल्याणी कल्लट्टी, डॉ. रूपादेवी होसमठ तसेच सीए वीणा बेटगेरी यांचा त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टतेबरोबरच समाजाप्रती असलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
परिसंवादात सौ. अनिता कणबर्गी यांनी "संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला" या विषयावर मार्गदर्शन केले. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, संपत्ती वाढविण्याच्या प्रभावी पद्धती आणि पुढील पिढ्यांसाठी संपत्तीचे योग्य व्यवस्थापन याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्याख्यानानंतर रोटरी क्लबतर्फे त्यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन सविता वेसणे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन अॅड. दिव्या मुडिगौडर यांनी केले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*