Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची*

लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची

मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण

बेळगांव ः सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे प्रतिपादन बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. पत्रकार संघातर्फे मंगळवारी ( ६ जानेवारी) पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

पत्रकार दिनानिमित्त संघातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की यांना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रारंभी धुराजी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांच्या हस्ते धुराजी यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच धुराजी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून पत्की यांना सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे धुराजी यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. समाजात होणा-या अन्यायाविरोधात पत्रकार आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असतात. युद्धकाळात तर जीव धोक्यात घालून ते लोकांपर्यंत माहिती पोहचवतात. हे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे.

बालमुकुंद पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यवाह महेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले.

पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*