Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जुन्या आठवणींना उजाळा; १९९३ बॅचचा उद्या गुरुवंदना व स्नेहमेळावा*

बेळगाव : शाळेच्या आठवणी, मित्रांची साथ आणि गुरूंचे मार्गदर्शन या सगळ्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी शहापूर येथील शाळा क्रमांक १९ च्या १९९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच जुन्या मित्रमैत्रिणींशी भेट घडवून आणण्यासाठी गुरुवंदना व माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम अळवण गल्ली, शहापूर येथील शाळा परिसरात बुधवार, दिनांक २० रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. गुरुवंदना उपक्रमांतर्गत निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगणार आहे.

कार्यक्रमात सामूहिक स्पर्धा, मनमोकळ्या गप्पा, आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव कथन यांसारखे उपक्रम ठेवण्यात आले आहेत. या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र येण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

या कार्यक्रमास शाळेचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित राहून स्नेहमेळावा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शहराध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी*कारगिल विजय दिन: बेळगावातील MARATHA LIRC मध्ये शहीदांना मानवंदना**सेल्फी घेताना घडली शोकांतिका; तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह सापडला**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात**हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त**कारगिल विजय दिन: बेळगावात आमदार आसिफ सेठ यांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली**कारगिल विजय दिन: बेळगावात माजी सैनिकांची भव्य तिरंगा बाईक रॅली*कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहन