Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावातील प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार*


बेळगाव, प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी भेट देत सीमाभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी बेळगावला अल्पकालीन भेट दिली. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित सक्तीच्या कारवाया, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच बेळगाव महापालिकेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमावासीयांच्या भावना आणि अपेक्षा मांडत हा विषय राज्य पातळीवर पोहोचवण्याची विनंती केली. त्यावर प्रतिक्रिया देताना अरुणभाई दूधवडकर यांनी सीमाभागातील नागरिकांचा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

तसेच, सीमावासीयांच्या प्रश्नांबाबत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका पूर्वीप्रमाणेच ठाम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीमाभागातील मराठी जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष कायम पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान सीमाप्रश्नासह विविध सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमत अभिवादन**नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात; बेळगावातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण**कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट**बेळगावातील वकिलांकडून आयजीपी संदीप पाटील यांचा विशेष सत्कार**झाडे लावा झाडे जगवा स्केटिंग रॅली द्वारे संदेश**धाराशिवच्या साहित्य संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार**बेळगाव वाहनधारकांना दिलासा मिळणार? गोवा CM प्रमोद सावंत यांना निवेदन**बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी**ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा**बेळगावातील प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार*