असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी कंकण मंगळसूत्र विधी पार पडला. गुरुवारी सकाळी महायज्ञ करून धार्मिक विधिना प्रारंभ झाला. वेदशास्त्र संपन्न पुरोहिताना या महायज्ञ साठी निमंत्रित करण्यात आले होते. महायज्ञ झाल्यानंतर देवीला साडी हळद-कुंकू, काकणे भक्तांनी अर्पण केली. देवींची महापूजा झाल्या नंतर आरती करून महानैवेद्य दाखवण्यात आला. यल्लमा डोंगरापासून तीन किलोमीटर अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जोगुळभावी येथील कुंडात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. दोन दिवसात पाच लाखाहून अधिक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.सायंकाळ झाली तरी भंडाऱ्याची उधळण करत आणि उदे ग आई उदेचा जयघोष करत भक्त डोंगरावर येतच होते.
Also read









