बेळगाव: दिनांक 10 सप्टेंबर या दिवशी मराठी विद्यानिकेतन बेळगाव जागृती मंच विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती ऐवजी माती किंवा शाडूचेच गणपती आणणे, गणपतीची सजावट फुले, पाणी, कागद अशा नैसर्गिक वस्तुंनीच करणे ,हवेचे प्रदूषण आणि शारीरिक इजा होऊ नये म्हणून फटाके न वाजवणे, लहान बाळे ,वृद्ध माणसे ,गर्भवती स्त्रिया, आजारी व रुग्ण माणसे अशांसाठी धोकादायक ठरणाऱ्या ,सर्वांच्याच कानांना ,डोळ्यांना इजा करणाऱ्या आणि प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या लाऊड स्पीकर ,डॉल्बी लेझर किरण, डीजेला हद्दपार करणे, समस्त मानव जातीच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आपण डॉल्बीमुक्त , पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन करण्यात आले. प्रथम धर्मवीर संभाजी चौकात एक जागृती सभा घेण्यात आली.
त्यानंतर तीन गटांमध्ये हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, आणि वनिता विद्यालय शाळेजवळ आवाहनाची पत्रके वाटण्यात आली. वेगवेगळ्या घोषणांतून जागृती करण्यात आली.ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. शिवाजी कागणीकर , शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शाळेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, जागृती मंच प्रमुख शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील,बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर , शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, अरुण बाळेकुंद्री , गजानन सावंत, धीरज राजपूत,बी. एम. पाटील, महेश हगीदळे, इतर शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
