ज्योती सेंट्रल स्कूल ची अभिमानास्पद कामगिरी!
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी अवनीश पी. चव्हाण याने ‘चित्रांकन – एक्सलन्स थ्रू ड्रॉइंग’ या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम – बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. कॅटेगरी २ (इयत्ता ५ वी ते ७ वी) या गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस्. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी अवनीशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

