LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*बेळगावात सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात आंदोलन; 'नीट' चौकशीची मागणी*

 सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध तसेच 'नीट' वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी बेळगावातील विविध पुरोगामी संघटनांनी सोमवारी भव्य पादयात्रा काढली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही पादयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान राजू टोपणावर यांनी 'नीट' परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप केला. अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

शिवाजीराव कागणीकर यांनीही 'नीट' परीक्षेसंदर्भातील वादग्रस्त घटनांनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका मांडली. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि नैराश्य निर्माण होऊ नये यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आंदोलकांनी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी त्यांना अटक करण्यात आल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता टिकविणे आणि सर्व घटकांना समान संधी मिळावी, यासाठी शासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी