LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावच्या दसरा सीमोल्लंघन सोहळ्याची पूर्वतयारी सुरू –*

बेळगावच्या दसरा सीमोल्लंघन सोहळ्याची पूर्वतयारी सुरू – मनपा आयुक्तांना महामंडळाचे निवेदन

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आज, 24 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त बी. शुभा यांना निवेदन सादर करण्यात आले.

शतकानुशतके चालत आलेली बेळगावची दसरा परंपरा म्हैसूर नंतर सर्वाधिक प्रतिष्ठेने साजरी केली जाते. दरवर्षी प्रमाणेच यंदाही "सीमोल्लंघन मैदान" (मराठी विद्यानिकेतन मैदान, कॅम्प) येथे विजयादशमीचा सोहळा शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांत महामंडळाने दसरा सोहळ्याला भव्यतेसह शिस्तबद्धता दिल्यामुळे शहरातील भक्तगण आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो.

यंदाच्या आयोजनासाठी मनपा आयुक्तांसह महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच उत्तर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू शेठ यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

या वेळी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, स्वागत अध्यक्ष व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष अंकुश केसरकर, मल्लेश चौगुले, तसेच बेळगावातील विविध देवस्थानचे पदाधिकारी परशुराम किल्लेकर, श्रीनाथ पवार, मृगेंद्र अंगडी, गौतम पाटील, सुनील बोकडे, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

यंदाही हा ऐतिहासिक विजयादशमीचा सोहळा शहरवासीयांच्या सहभागामुळे अधिक आकर्षक व संस्मरणीय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*