Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*न्यू गुडशेड रोडवरील श्री गणेश मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव*

न्यू गुडशेड रोडवरील श्री गणेश मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव;

बेळगाव | प्रतिनिधी

बेळगाव शहरातील न्यू गुडशेड रोड परिसरात शुक्रवारी भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. 4 व 5व्या क्रॉस येथे असलेल्या श्री गणेश मंदिराच्या नूतनीकरणानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक विधींसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक दिवसांपासून सुरू असलेले श्री गणेश मंदिराचे जिर्णोद्धार कार्य नुकतेच पूर्ण झाले असून, त्यानंतर मंदिरात श्री गणेश, मूषक व उत्सव मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात 1 फेब्रुवारी रोजी शहापूर येथील शिवाजी उद्यानातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली. शोभायात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर अनुभवी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली होम-हवन, कलशारोहण यांसारखे सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यात आले.

शुक्रवारी दुपारी 12 वाजता महा मंगलारतीनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आसपासच्या भागातील हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला. भजन, कीर्तन आणि गणपतीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी मंदिराचे विश्वस्त विश्वनाथ झाड यांनी जिर्णोद्धाराच्या विविध टप्प्यांची माहिती देत, या कार्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व भाविकांचे आभार मानले. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*