LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून बेळगावात राजकीय वातावरण तापले*

शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच बेळगाव जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. मंगळवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत दोन गटांतील समर्थकांमध्ये तीव्र शाब्दिक खडाजंगी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.

एआयसीसीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून शहराध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अध्यक्षपदासाठी कोणाला संधी द्यावी, यावर एकमत होत नसल्याने विविध गटांतील मतभेद स्पष्टपणे समोर येत आहेत.

बैठकीदरम्यान माजी नगरसेवक फईम नाईकवाडी आणि विद्यमान नगरसेवक अजीम पटवेगार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद रंगला. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण होताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांतील नेत्यांशी चर्चा केली. पक्षाची प्रतिमा आणि संघटनात्मक हित लक्षात घेऊन संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडकडूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, याच अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान सोमवारीही जिल्हा काँग्रेस कार्यालयात दोन गटांमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी धक्काबुक्की आणि मारामारी झाल्याचे आरोप करण्यात आले होते. सलग दुसऱ्या दिवशीही वाद निर्माण झाल्याने बेळगाव शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, शहराध्यक्षपदाची धुरा अखेर कोणाकडे सोपवली जाणार, याकडे आता पक्षातील कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*