Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात*

पोलीस म्हणजे कडक शिस्तीचा, कायद्याचे पालन करणारा, प्रसंगी लाठी उगारणारा असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण या खाकी वर्दीच्या आतमध्ये एक संवेदनशील माणूस देखील असतो याचे दर्शम बेळगावच्या पोलीस आयुक्तांच्या कृतीतून घडले.
  बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या संवेदनशीलपणा  बेळगावच्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकात पाहायला मिळाला.

भाजपच्या आंदोलनासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने  चौकात जमले होते.घोषणाबाजी सुरु होती, रस्त्यावर धरणे सुरु होते. आंदोलन सुरू असतानाच अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. आंदोलन सुरु असताना   पावसाचा जोर वाढला आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही वृद्धांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला.

यावेळी बंदोबस्ताचे निरीक्षण   करत असलेले बेळगावचे   पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव  बोरसे यांनी वृद्ध आंदोलक पावसात भिजत असलेले पाहिले.  त्यांनी पुढे येत या वृद्ध आंदोलकांना आपल्या छत्रीत घेतले. 

पोलिस आयुक्तांचा ही एकदम साधी वाटणारी कृती पण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरली. घडला प्रसंग साधा पण पोलीस अधिकाऱ्याच्या संवेदनशील पणाचे दर्शन घडवणारा ठरला.पण मनाला भिडणारा क्षण उपस्थितांच्या नजरेत भरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाई