पंत महाराजांचे वंशज परमपूज्य रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराजांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.
यमुनाक्का भजनी मंडळाच्या महिलानी प्रेम ध्वजाची आरती म्हटली. याप्रसंगी पंत-बाळेकुंद्री कुटुंबीय आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.बेळगाव मधून निघालेली पालखी
पंत बाळेकुंद्री गावातील वाड्यात पोचली. सायंकाळी बाळेकुंद्रीतील पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूक निघून मंदिरस्थळी दाखल झाली. प्रेम ध्वजारोहण झाल्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी हजारो भक्त महाराष्ट्रातून दाखल झाले आहेत.
Also read









