LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*पानिपतकार विश्वास पाटील यांचा साहित्य परिषदतर्फे सत्कार*

बेळगाव ( प्रतिनिधी ) दि. १३ -
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांचा राज्याध्यक्ष रवींद्र पाटील तसेच तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमाला – २०२६ निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर होते.

आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून त्यांनी साहित्य, इतिहास आणि लेखनप्रवास यावर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या भाषणानंतर बेळगावमधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन – २०२५’ चे संमेलनाध्यक्ष म्हणूनही विश्वास पाटील यांनी यापूर्वी मानाचा बहुमान भूषविला होता.या प्रसंगी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

“पानिपत”सारख्या गाजलेल्या कादंबरीतून मराठी साहित्यविश्वात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांच्या साहित्यसेवेचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास साहित्यप्रेमी व महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमास साहित्यप्रेमींसह महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*