LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन*

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

उपक्रमशील मराठी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत स्मार्ट क्लास उदघाटन, पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, खाऊ कट्टा व आठवडी बाजार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोर्डाचे सीईओ श्री सुदाम मंचलवार,प्रमुख पाहुणे म्हणून लेक व्यू हॉस्पिटलचे एम.डी. डॉ.गिरीश सोनवालकर,बोर्डाचे सदस्य सुधीर तुपेकर,ऑडिटर मॅरीलीन कोरिया,ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर,शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य,पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

डॉक्टर गिरीश सोनवालकर यांच्या सहकार्याने इयत्ता पहिलीच्या स्मार्ट क्लासचे उद्घाटन गिरीश सोनवालकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मुलांनी सर्व पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले त्याचबरोबर मुलांनी विविध अभिनय गीते सादर करून वाहवा मिळवली. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.

यानंतर पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सीईओ सुदाम मंचलवार यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात डोळे तपासणी,रक्तदाब,साखर व इतर तपासण्या करण्यात आल्या.हे तपासणी शिबीर लेक व्यू हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.आरोग्य तपासणी शिबिराला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे,खरेदी-विक्री,नफा-तोटा या संकल्पना प्रत्यक्षात समजून याव्यात, त्याचबरोबर संभाषण कौशल्य वाढावे या उद्देशाने आठवडी बाजार त्याचबरोबर खाऊ कट्टा या संकल्पनेतुन विविध खाऊचे स्टॉल मांडण्यात आले होते.याचे उद्घाटन स्कूल ऑडिटर मॅरीलीन कोरिया व शाळेचे ब्रँड अंबॅसीडर समाज सेवक संतोष दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील त्याचबरोबर मार्केटमधील फळभाज्या, पालेभाज्या, विविध कडधान्ये यांचे स्टॉल लावले आले होते.काही विद्यार्थ्यांनी घरगुती तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विविध पदार्थांची चव घेतली.

सि. ई. ओ. मंचलवार यांनी शाळेने राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करून शाळेतील उपक्रम व शैक्षणिक दर्जा पाहून समाधान व्यक्त केले व शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा बोर्डातर्फे उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली.

मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक उदय पाटील, धनाजी कुरणे,नीता गुंजीकर, श्रीकांत काटकर,मनीषा वड्डगोळ, तुषार कांबळे,राहुल कांबळे,रेणुका अंबी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*