LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*


बेळगाव :
कन्नड सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महामोर्चावरून बेळगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामोर्चाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून विविध बैठका घेऊन मराठी भाषिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला. महामोर्चाला परवानगी दिल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महामोर्चासंदर्भात समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे. नागरिकांनी शांततेत आपली भूमिका मांडावी आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून २२ जूनच्या महामोर्चासाठी शहर तसेच ग्रामीण भागात जनजागृती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी निवेदने दिल्याने बेळगावमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*