स्थानिक रहिवाशांनी ही बाब नगरसेवक नितीन जाधव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून समस्येचे मूळ शोधण्यात आले.
तपासादरम्यान परिसरातील काही ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महानगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेत दूषित पाण्याचा प्रवाह थांबवला.
संबंधित यंत्रणेकडून आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक व प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी माजी नगरसेविका संयोगिता हलगेकर, महानगरपालिकेचे अधिकारी, एल अँड टी विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Also read









