Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“स्वच्छ बेळगांव उत्सव” कार्यक्रमावर प्रशासनाचा मोठा निर्णय*

बेळगाव शहरात “स्वच्छ बेळगाव उत्सव” या नावाने आयोजित करण्यात येणाऱ्या मोठ्या कार्यक्रमापूर्वी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमास परवानगी नाकारल्यानंतर आता महापालिकेनेही अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या बॅनर आणि जाहिरात फलकांवर धडक कारवाई केली.

शिवम असोसिएट्सतर्फे १७ मे रोजी सरदार्स मैदानावर सुमारे २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले होते.

मात्र महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हे सर्व बॅनर हटवण्यास सुरुवात केली. शहराचे सौंदर्य बिघडवणारे आणि नियमांचे उल्लंघन करणारे कोणतेही फलक सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, कार्यक्रमासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, सुरक्षा व्यवस्था आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईमुळे आयोजकांना आणखी धक्का बसला आहे.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, शहरात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर लावण्याविरोधात पुढील काळातही सातत्याने मोहीम राबवली जाणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शहराध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी*कारगिल विजय दिन: बेळगावातील MARATHA LIRC मध्ये शहीदांना मानवंदना**सेल्फी घेताना घडली शोकांतिका; तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह सापडला**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात**हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त**कारगिल विजय दिन: बेळगावात आमदार आसिफ सेठ यांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली**कारगिल विजय दिन: बेळगावात माजी सैनिकांची भव्य तिरंगा बाईक रॅली*कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहन