LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव*

 विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांना येणाऱ्या अडचणींबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या भेटीत प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांवर, नागरिकांशी समन्वय साधताना उद्भवणाऱ्या अडचणींवर तसेच सर्वेक्षण अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधून या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, अशी मागणी किरण जाधव यांनी खासदार शेट्टर यांच्याकडे केली.

यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभाग आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मतदार यादी पुनरिक्षणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत योगदान देणाऱ्या BLO आणि BLA यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करत त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

या बैठकीला हनमंत कागलकर, राजन जाधव, गणेश देढे, पार्थ भोसले आणि विनायक शिनगावकर उपस्थित होते. या चर्चेमुळे SIR सर्वेक्षणाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांना लवकरच मार्ग मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*