LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश : १ नोव्हेंबर ‘काळा दिन’ पाळण्यास बंदी नाही,*

बेळगाव :
१९५६ साली भाषिक प्रांतरचनेनंतर बेळगावसह सीमाभागाचा समावेश तत्कालीन मैसूर (आताचे कर्नाटक) राज्यात करण्यात आला. त्या दिवसापासून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात ‘काळा दिन’ किंवा ‘सुतक दिन’ म्हणून पाळला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा दिवस शांततापूर्ण निदर्शने, मोर्चे आणि सभा घेऊन दरवर्षी साजरा केला जातो.

मात्र, या आंदोलनांवर बंदी आणण्याची मागणी करणारी जनहित याचिका मल्लप्पा चय्याप्पा अक्षराड यांनी बंगळुरू येथील कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती विभू बखरू आणि न्यायमूर्ती सी.एम. पुनचा यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की — “देशातील प्रत्येक नागरिकाला आंदोलन, निदर्शने आणि मोर्चे काढण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. त्यामुळे अशा उपक्रमांवर कोणत्याही प्रकारची बंदी घालता येणार नाही.”

न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, संबंधित संघटनांनी निदर्शनांपूर्वी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेणे गरजेचे राहील. तसेच निदर्शनांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.

या निर्णयामुळे सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दशकांपासून सुरू असलेल्या आंदोलनांना कायदेशीर स्पष्टता आणि पाठबळ मिळाले आहे. महाराष्ट्रात विलिनीकरणाच्या मागणीसाठी शांततामय लढा देणाऱ्या समितीला या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*