LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कित्तूर उत्सवात कन्नड कलाकारांचा अपमान?*

बेळगाव :
राज्यात ऐतिहासिक कित्तूर किल्ल्यात नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर उत्सवाच्या समारोप समारंभात एका वादग्रस्त घटनेने संतापाची लाट उसळली आहे. कन्नड कलाकारांशी अन्याय झाल्याचा आरोप होत असून, अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कार्यक्रमादरम्यान कन्नड गायक हनुमंत लमाणी हे मंचावर आपले सादरीकरण करत होते. त्यांचा कार्यक्रम थोडा वेळ वाढला असला तरी प्रेक्षकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. मात्र त्याच वेळी पोलीस अधीक्षक भिमाशंकर गुलेड यांनी “कार्यक्रम वेळ संपला आहे” असा आदेश देत गायकाला थांबवण्याचा निर्देश दिला.

या प्रकरणात कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजन्त्री यांनी कलाकाराला सन्मानपूर्वक वेळ दिला होता. यावरूनच एसपी गुलेड यांनी त्यांच्याशी मंचावरच तीव्र शब्दांत वाद घातल्याचे साक्षीदारांनी सांगितले.

मंचावरच्या या वादामुळे प्रेक्षक आणि उपस्थित मान्यवर अवाक् झाले.
विधायक बाबासाहेब पाटील हे देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते; मात्र संपूर्ण प्रकार त्यांच्या समोरच घडला.

या वादानंतर कन्नड गायकाचा कार्यक्रम अर्धवट बंद करण्यात आला आणि मुंबईहून आलेल्या सिंगरला प्राधान्य दिले गेले, असा आरोप स्थानिक सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि सांस्कृतिक वर्तुळात “कन्नड कलाकारांचा अपमान” या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. कित्तूर उत्सव हा कर्नाटकाच्या संस्कृतीचा उत्सव मानला जातो, आणि त्याच ठिकाणी कन्नड कलाकारांशी अन्याय झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*