बेळगाव :
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत तारांगण आणि कंग्राळी बी.के. ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कलमेश्वर मंदिर हॉल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवार, 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या या आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हाडांची तपासणी, हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, स्त्रीरोग तपासणी आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरासाठी सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री ऑर्थो अँड ट्रॉमा केअर, एम.एम. जोशी कोडकिणी आय सेंटर, वन डेंटल, गिजरे मॅटर्निटी हॉस्पिटल आणि नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय पथकांनी सहकार्य केले.
यावेळी तारांगणच्या अध्यक्षा अरुणा गोजे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. मेनका कोरडे, जिल्हा वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवशाही युवक मंडळ, बाल शिवाजी युवक मंडळ, बाल संभाजी युवक मंडळ, कलमेश्वर युवक मंडळ, मरगाई युवक मंडळ, विघ्नहर्ता युवक मंडळ, बाल तरुण युवक मंडळ, मसनाई युवक मंडळ, साई युवक मित्र मंडळ, श्री कलमेश्वर सेवा समिती, बाल गणेश युवक मंडळ आणि माजी सैनिक संघटना कंग्राळी बी.के. यांनी सहभाग घेतला.
आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना अशा उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
