Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कंग्राळी बी. के. येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*

कंग्राळी बी. के. : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तारांगण आणि कंग्राळी बी. के. ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आरोग्य शिबिर रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कलमेश्वर मंदिर हॉल, कंग्राळी बी. के. येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदाब व मधुमेह तपासणीसह हाडांची तपासणी, हृदयरोग तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, स्त्रीरोग तपासणी आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग तपासणीसाठी सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार आहे. हाडांच्या तपासणीसाठी श्री ऑर्थो अँड ट्रॉमा केअर, डोळ्यांसाठी एम. एम. जोशी कोडकिणी आय सेंटर, दंत तपासणीसाठी वन डेंटल, स्त्रीरोग तपासणीसाठी गिजरे मॅटर्निटी हॉस्पिटल तसेच बालरोग तपासणीसाठी नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल सहभागी होणार आहेत.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सौ. मेनका कोरडे तसेच मा. अध्यक्ष, जिल्हा वकील संघटना बेळगाव अॅड. सुधीर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

शिबिरासाठी विविध युवक मंडळे, श्री कलमेश्वर सेवा समिती आणि माजी सैनिक संघटना कंग्राळी बी. के. यांचा सहभाग राहणार आहे.
सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ईडी कारवाईवर सतीश जारकीहोळींचे मोठे वक्तव्य; राजकीय हेतूचा दावा नाही**प्राचार्य आनंद आपटेकर यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित**महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी**बेळगाव पोलिसांचा अंमली पदार्थांवर प्रहार; १४ पोलीस ठाण्यांतील १० लाखांचा साठा नष्ट**स्थानिक युवकांसाठी रोजगाराची मागणी; गोंडवाड ग्रामस्थांचे निवेदन**कंग्राळी बी. के. येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन**ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पदग्रहण समारंभ**बेळगाव पोलिसांचा अवैध धंद्यांवर मोठा बडगा; दारू, मटका आणि गांजा प्रकरणात कारवाई**हॉकीच्या पंढरीत पुन्हा रंगणार खेळाचा जल्लोष; ‘खेलो इंडिया’तून विकासाला गती*