Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समर कॅम्प’चा जल्लोष;*

*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समर कॅम्प’चा जल्लोष;*

*“स्विमिंग” आणि “हॉर्स रायडिंग” चे विशेष आकर्षण*

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प बेळगाव येथे ‘समर कॅम्प’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एस.एम.सी. कमिटीचे सदस्य अरविंद संगोळ्ळी यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या नियोजनाखाली हे शिबिर प्रगतीपथावर आहे.

यंदाच्या शिबिरात हॉर्स रायडिंग हे मुख्य आकर्षण ठरत असून, घोड्यावर स्वार होऊन रपेट मारताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या साहसी खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे. तसेच, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर स्विमिंग या उपक्रमाचाही विद्यार्थी मनमुराद आनंद लुटत आहेत.

केवळ खेळच नव्हे, तर मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी योगासने, तायक्वांदो, संगीत, नृत्य आणि आर्ट अँड क्राफ्ट यांसारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत करण्यासाठी ‘बेसिक क्लासेस’चेही आयोजन करण्यात आले आहे.

शाळेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले असून, मुलांच्या आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे शिबिर २४ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*