Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम*

बेळगाव /
       भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

तर लोकगीत स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

      हिंदी विभागात द्वितीय क्रमांक लव्ह डेल सेंट्रल स्कूल आणि तृतीय क्रमांक डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने प्राप्त केला. उत्तेजनार्थ एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल व भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल तसेच विशेष पारितोषिके ज्ञान प्रबोधन मंदिर, बालिकादर्श विद्यालय व बी. के. मॉडेल हायस्कूल यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक के. एल्. एस्. स्कूल, तृतीय क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूलने मिळविला. उत्तेजनार्थ म्हणून एम्. आर. भंडारी स्कूल व भरतेश हायस्कूल तसेच संत मीरा हायस्कूल, जी. जी. चिटणीस 
स्कूल आणि स्वाध्याय विद्या मंदीर यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

      कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भारत विकास परिषदेचे राज्य प्रभारी सुहास चांडक तसेच गौरव अतिथी म्हणून प्राचार्य व्ही. एन्. जोशी व रामचंद्र तिगडी. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरमने झाली.

मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या ध्येयधोरणे व सेवाकार्याबाबत माहिती दिली. लक्ष्मी तिगडी यांनी यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. पंडीत नंदन हेर्लेकर, किशोर काकडे व आदिनाथ पाटील (चंदगड) यांनी परिक्षकांचे कार्य पाहिले. 

       मुख्य अतिथी सुहास चांडक यांनी, देशाप्रती आपली कर्तव्ये आणि सामाजिक बांधिलकी याबाबत विवेचन करून परिषदेच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निस्वार्थ राष्ट्रसेवेबाबत आपले विचार मांडले. प्रा. अरुणा नाईक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

       कार्यक्रमास डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, पांडुरंग नायक, डॉ. जे. जी. नाईक, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, चंद्रशेखर इटी, पी. जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, विद्या इटी, मंगल कुलकर्णी, स्मिता भुजगुरव, ज्योती प्रभू, अक्षता मोरे, शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावमध्ये शेळी चोरीचा पर्दाफाश; दोघे अटकेत, 7 शेळ्या-बोकडांसह कार जप्त*ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये २४ तास मद्यविक्री बंद; पोलीस आयुक्तांचा आदेशMaratha Mandal Polytechnicच्या विद्यार्थ्यांची नवकल्पनांना भरारी! *स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थ्याची भरारी; हर्षा सत्तिगेरी यांची Qatar Airways मध्ये निवड**कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या; समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी**भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम**जनतेच्या समस्या जाणून घेत लक्ष्मी हेब्बाळकर; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना**अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापाचा उद्रेक; कुऱ्हाडीने वार करून व्यक्तीची हत्या**कंग्राळी खुर्दमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग कंग्राळी खुर्द | प्रतिनिधी*महिला PSIच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; हिंडलगा कारागृहाची बदनामी केल्याचा आरोप