कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पत्रकार व निवेदक मेघराज रमेश हट्टी यांचा कलावंत म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक लोकप्रिय रील स्टार्सनी त्यांच्या नव्या गाण्यांचे प्रोमोशन केले. श्रुष्टी ऐरवे, ओंकार जाधव यांच्यासह कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध कलावंतांचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, संस्थापक अध्यक्ष शेलार बुवा साहेब, तसेच संदीप शिंदे व प्रणवी पाटील यांची उपस्थिती लाभली. प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील गाजलेले कलाकार यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष बहार आली.
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा मेळावा कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि नव्या पिढीतील कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्याचा एक उल्लेखनीय उपक्रम ठरला.
Also read









