Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*गणेशपुर येथे महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जनता दरबार*

बेळगाव | प्रतिनिधी
महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गणेशपुर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या. हा जनता दरबार दलित नेते मल्लेश चौगुले यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.

या वेळी गणेशपुर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, घरकुल, महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध समस्या नागरिकांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारीची नोंद घेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

याप्रसंगी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, सामान्य जनतेच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी जनता दरबार उपयुक्त ठरतो. येत्या काळात गणेशपुर परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जनता दरबारामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम,आडवेश इठगीमठ, महेश कोलकर, यांच्यासह काँग्रेस नेते स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*