LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*वैभव नगरात आमदार आसिफ (राजू) सेट यांचा जनता दरबार*

वैभव नगरात आमदार आसिफ (राजू) सेट यांचा जनता दरबार — नागरिकांच्या समस्या जाणून घेत दिले तत्काळ तोडगा देण्याचे आश्वासन

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेट यांनी वैभव नगरातील बसव कॉलनी येथे जनता दरबाराचे आयोजन करून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या दरम्यान त्यांनी परिसरातील विविध नागरी अडचणी, मूलभूत सुविधा आणि विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या.

आमदार सेट यांनी स्वतः नागरिकांसोबत परिसरातील रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सुविधा पाहणी करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

या वेळी आमदारांसोबत नगरसेवक, स्थानिक नेते आणि नगरपालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परिसरातील प्रलंबित आणि सुरु असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत त्यांनी नियोजित प्रकल्पांचा आढावा घेतला.

आमदार आसिफ (राजू) सेट यांनी सांगितले की, “जनता दरबाराच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी व अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. पारदर्शक आणि उत्तरदायी शासन हीच आमची प्राथमिकता आहे.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*