Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*केदनूरच्या श्री जोतिबा मंदिरात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा*

बेळगाव तालुक्यातील केदनूर येथील श्री जोतिबा मंदिर परिसरात 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील विविध महिला संघटनांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

गावातील महिला बचत गट, आशा कार्यकर्त्या, संजीवनी गटाच्या सदस्य, तसेच जनजागरण योजनेच्या महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला. श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या वतीने जिल्हा संयोजक अँथोनी जेकब, यशवंत भांदुर्गे आणि पिराजी माहूत यांच्या संयुक्त पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात कोटक बँकेच्या प्रतिनिधी पियांगू पोरवाल यांनी महिलांना अल्प बचतीचे महत्त्व आणि त्यातून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता कशी मिळू शकते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मंगल कोरे यांनी सकारात्मक विचारसरणी आणि प्रयत्नांच्या माध्यमातून आनंदी जीवन कसे जगता येते यावर विचार मांडले.

यावेळी डॉ. स्नेहा पाटील यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित तपासणीचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली याविषयी उपयुक्त माहिती दिली.

या कार्यक्रमाला गावातील विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरण आणि जागरूकतेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*