LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*“आरएसएसवर बोलण्याऐवजी संस्कार शिकावेत — माजी आ. संजय पाटील*

बेळगाव :
कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यांवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार संजय पाटील यांनी प्रखर शब्दांत खर्गे यांच्यावर टीका करत म्हटले की, “आरएसएसवर आरोप करण्याऐवजी त्यांनी आधी संस्कार शिकावेत.”

मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाटील म्हणाले की, “प्रियांक खर्गे यांची विचारसरणी आणि बोलणे दोन्ही विसंगत आहे. त्यांनी अनेकदा विषयाशी संबंध नसलेली, असंबद्ध वक्तव्ये केली आहेत. आरएसएस ही राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणारी देशभक्त संघटना आहे. अशा संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे म्हणजे समाजहिताला धक्का देणारी कृती आहे.”

त्यांनी पुढे म्हटले की, “प्रियांक खर्गे यांनी मंत्री म्हणून ग्रामीण विकास, आयटी-बिटी, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करण्याची संधी असूनही ठोस कार्य केलेले नाही. फक्त ‘मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा’ हीच त्यांची पात्रता आहे. दोन-अडीच वर्षे मंत्री असूनही त्यांनी कोणतेही क्रांतिकारी काम दाखवले नाही.”

राज्यातील कायदा-सुव्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, शेतकऱ्यांचे नुकसान आणि आत्महत्या वाढत असल्याचे नमूद करत पाटील म्हणाले की, “या गंभीर विषयांवर लक्ष देऊन मुख्यमंत्री यांना पत्र लिहावे, आरएसएसविरोधात नव्हे.”

त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्यावरही त्यांनी टीका करत म्हटले की, “पक्षातील वरिष्ठांना खूश करण्यासाठी आरएसएसला उग्र संघटना ठरवणे हा अपमानास्पद प्रकार आहे. अशा वर्तनाने काँग्रेसची प्रतिमा अधिकच घसरत आहे.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*