LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्री विश्वकर्मा सेवा संघाचा अभिनव उपक्रम*

बेळगावातील श्री विश्वकर्मा सेवा संघ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. 7वी, 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मार्ककार्डची झेरॉक्स प्रत आणि एक पासपोर्ट साईज फोटो सादर करणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

कागदपत्रे जमा करण्यासाठी रविवार, 24 मे 2026 आणि रविवार, 30 मे 2026 या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत श्री विश्वकर्मा सेवा संघ कार्यालय, उद्यमबाग, बेळगाव येथे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, निपाणी, संकेश्वर आणि गोवा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी WhatsApp द्वारे कागदपत्रे पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांचे फोटो काढून संघाच्या अधिकृत मोबाईल 8431935103,7259748781,9449650125 क्रमांकावर पाठवावेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

कागदपत्रे संकलित झाल्यानंतर सत्कार समारंभाची अंतिम तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*