LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थची पुढाकार

बेळगाव : "सेवा सर्वोपरी" या ब्रीदवाक्याला अनुसरून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या वतीने आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
रोटरी क्लबने नागरिकांसाठी दहा महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये फक्त मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करणे, पीओपी (Plaster of Paris) मूर्ती टाळणे, नैसर्गिक रंगांचा वापर, कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जन करणे, प्लास्टिक व थर्माकोल सजावट टाळणे, एलईडी दिव्यांचा वापर, रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक न वापरणे, बाप्पासोबत एक झाड लावणे, निर्माल्यापासून खत तयार करणे आणि गृहनिर्माण संस्था व मंडळांमध्ये जनजागृती करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, बेळगाव शहरातील दहा ठिकाणी मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्याच मूर्तींची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानाचे अध्यक्ष रोटेरियन विकास गडवी, कार्यक्रम सचिव रोटेरियन मंगेश कांटक, अध्यक्ष (2026-27) रोटेरियन पी. डी. धोत्रे आणि सचिव (2026-27) डॉ. सुभाष पाटील यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*