Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

मराठी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

मराठी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 
    मराठी विद्यानिकेतनमध्ये 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील लॅब असिस्टंट शांताराम पाटील उपस्थित होते. यांनी मान्यवरांसहीत तिरंग्याचे ध्वजारोहण केले . झेंड्याला अभिवादन करण्यासाठी झेंडा गीत सादर करण्यात आले. यावेळी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली.एनसीसी कॅडेट वैभवी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांना मानवंदना दिली. एनसीसी प्रशिक्षण शिबीर पूर्ण केल्याबद्दल एनसीसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर शिवांश विष्णू बांडगे, क्षितीज ज्ञानेश ओऊळकर, शार्दुल अंकुश केसरकर, सान्वी अश्विनकुमार पाटील या बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी नेत्यांच्या वेशभूषेत तर शिशु वर्गातील अन्वित अतुल सूर्यवंशी, शिवांजली महादेव मुतगेकर, पुनर्वी राहुल मोदगेकर या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषांतून आपले मनोगत व्यक्त केले. प्रांजल श्रीधर नावगेकर हिने मराठी, वृंदा उमेश भांदुर्गे कन्नड, इंग्रजी समृद्धी विनायक येळवे, हिंदी भाषेत मनाली सुभाष बराटे आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रमुख पाहुणे शांताराम पाटील यांनी सद्यस्थितीतील स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या मनोगतात विशद केले. बालवाडी शिक्षिका  भारती शिराळे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर वेगवेगळ्या गाण्यातून तसेच नाटक व नाचावर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.   वंदे मातरमानंतर कार्यक्रमाचा शेवट झाला.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शाळेची पंतप्रधान मनाली सुभाष बराटे,विद्यार्थी, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती कुलकर्णी,वरदा देसाई यांनी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री स्वामी समर्थांची तिरंगी आरास; बेळगावच्या मंदिरात भाविकांची गर्दीस्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत तनय हुळीगोळ यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपविश्वकर्मा मनु:मय संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपफोर्ट रोडवर BAMAकडून ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरासरदार हायस्कूलमधील चेस पार्कचे पुनर्विकास; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला मिळणार चालनाहुणशीकट्टीत रुद्रमुनी शिवयोगी मठात शिलामूर्तीची प्राणप्रतिष्ठा; चन्नराज हट्टीहोळींचा सुसंवादाचा संदेश*राजर्षी शाहू विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*बेळगावमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताच्या कथित अवमानाविरोधात भाजपचे आंदोलन“भारत स्वतंत्र झाला; पण प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे का?” — आकाश हलगेकरमराठी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा