बेळगाव | प्रतिनिधी
कडोली जिल्हा पंचायत मतदारसंघातील देवगिरी येथील शासकीय प्राथमिक शाळेत ‘प्रतिभा कारंजे’ स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी तसेच युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक तसेच केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते प्रतिभा कारंजे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून आपल्या प्रतिभेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला संबंधित ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, सदस्य, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि विविध स्पर्धांना प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

