Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*हंदिगनूर येथील नूतन ग्रामपंचायतच्या इमारतीचे उद्घाटन*

यमकनमर्डी | प्रतिनिधी
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, प्रशासनिक सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने यमकनमर्डी मतदारसंघातील हंदिगनूर  गावात अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारती उभारण्यात आली  आहे. या इमारतींमुळे गावांच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री  सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या नूतन ग्रामपंचायत भवनांचे लोकार्पण मंत्री जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री जारकिहोळी म्हणाले की, “जनतेच्या सहकार्यामुळेच ही कामे पूर्ण होऊ शकली. ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेऊन काम केल्यास जनतेचा पाठिंबा कायम मिळतो. शिक्षण, मूलभूत सुविधा व ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे हीच खरी लोकसेवा आहे.”

ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटारे यांसारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे हे ग्रामपंचायतींचे मुख्य कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चांगल्या कामावर टीका होणे स्वाभाविक असून, अशा टीकांमधून अधिक ऊर्जा घेऊन विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

या कार्यक्रमाला मंत्री महोदयांचे निकटवर्तीय सहायक मलगौडा पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामण्णा गुळी, हंदिगनूर ग्रामपंचायत अध्यक्ष उज्वल सुतार, उपाध्यक्ष दयानंद, सुरेश जाधव, नागेश,  वंटमूरी ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धप्पा होळिकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू सुनगार, तसेच पंच गॅरंटी योजनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*