रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा रोटरी वर्ष २०२६–२७ साठीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभातून सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या कार्याला नव्या उत्साहाने प्रारंभ झाला.
शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी झालेल्या या समारंभात *रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी* यांनी अध्यक्षपदाची, *रोटेरियन ज्योती कुलकर्णी* यांनी सचिवपदाची आणि *रोटेरियन उर्मिला गाणी* यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमास रोटरी सदस्य, मान्यवर आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रोटरीच्या *"Service Above Self"* या ब्रीदवाक्याप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
समारोपाच्या वेळी नव्या नेतृत्वाने समाजोपयोगी सेवा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा तसेच मैत्री, सहकार्य आणि सेवाभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
