भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव महानगर जिल्हा कार्यालयात आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी मंत्री बैरती बसवराज प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबरोबरच आगामी राजकीय कार्यक्रम, जनसंपर्क अभियान आणि विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण करून पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गीता सुतार, आमदार अभय पाटील, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाली, विभाग प्रभारी संजय पाटील, डॉ. रवी पाटील, उज्वला बडवणाच, रमेश देशपांडे, राजेंद्र हरकुनी, जिल्हा सरचिटणीस ईरय्या खोत, राजशेखर दोणी, गणेश देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून पक्ष विस्ताराला गती देण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
