अवैध गोवा दारूचा मोठा साठा गोव्याहून महाराष्ट्रात ट्रकमधून नेण्यात येत असल्याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या पथकाने शहरातील श्रीनगर उद्यान येथे एक ट्रक अडवून त्याची झडती घेतली.ट्रकची तपासणी केली असता पोलिसांना ट्रकमध्ये गोवा दारूचे बॉक्स असल्याचे पोलिसांना आढळून आले. ट्रक चालकाकडे दारू वाहतूकी संदर्भात कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.बेकायदेशीररित्या 800 बॉक्स दारू साठ्याची गोव्याहून महाराष्ट्रामध्ये वाहतूक केली जात होती.
प्राथमिक तपासात पोलिसांनी जप्त केलेली दारू सुमारे 7000 लिटर इतकी असून बाजारभावानुसार तिची किंमत 30 लाख रुपये इतकी होते. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
Also read









