Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*भाजपकडून “I love Bharat ,I love RSS,” मोहिमेला सुरुवात*

बेळगाव : १६ ऑक्टोबर २०२५
भारतीय जनता पक्षाने “I love Bharat ,I love RSS,” या संदेशाचा प्रसार करण्यासाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाळेकुंद्री (खुर्द) येथे विशेष जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांनी घराघरात भेट देत पोस्टर लावले आणि नागरिकांशी थेट संवाद साधला.

कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुबाष पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी मंत्री प्रियंक खर्गे यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी म्हटले की, “संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्याचा आणि संघटनांचा अधिकार देते. संघावर बंदी घालण्याची मागणी ही अपरिपक्व आणि लोकशाहीविरोधी आहे.”

भाजप नेत्यांनी पुढे सांगितले की, “संघाने देशभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात केलेले योगदान मोठे आहे. मात्र, सत्तेच्या सोयीसाठी काही मंत्री अशा संस्थांचा अपमान करतात हे दुर्दैवी आहे.”

त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आवाहन केले की, “प्रियंक खर्गे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याबद्दल त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*