LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मराठा मंडळस' व 1988 माजी विद्यार्थी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी*

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!!

 या श्लोकाप्रमाणे माणसाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्य साधारण आहे माणूस जन्माला येण्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक क्षणी गुरू करत असतो. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य या नात्याचा आदर करण्याचा दिवस आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या व योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे अशीच कृतज्ञता मराठा मंडळ चव्हाट गल्ली हायस्कूल बेळगाव येथे सेंट्रल हायस्कूलचे 1988 सालचे माजी विद्यार्थी संयुक्तपणे गुरुपौर्णिमा साजरी.

करण्यात आली गुरुजनांच्या कृतज्ञतेसाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो यात माझी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम करणे म्हणजे जेणेकरून भावी पिढी सुद्धा ते अनुकरण करावे हा उद्देश आहे .. यात सर्व शिक्षकांना श्रीफळ धार्मिक ग्रंथभेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे मुख्याध्यापक आदरणीय एम के पाटील सर सेंट्रल हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक डी टी सावंत सर जिजामाता हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका नीलू पावशे  मॅडम उपस्थित होत्या व व्यासपीठावर तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रस्तावना सेंट्रल हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक सावंत सर यांनी केले तर "गुरुबद्दल" असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  सेंट्रल हायस्कूल मधील 1988 बॅचमधील विनोद हंगेरगेकर,मराठा बँक संचालक प्रफुल शिरवलकर, गिरीश धामणेकर, गजानन बांदेकर , ह. भ.प.राजू महाराज कावळे, संजय हिशोबकर, लक्ष्मीकांत हावळ, चंद्रशेखर पाटणकर, विकास मांडेकर ,कलाप्पा हांडे 
, विलास लाड, विनोद चौगुले , अनिल गुंडूचे, तसेच _विद्यमान शाळेतील   विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या सेक्रेटरी कडून शिक्षकांना पुष्प श्रीफळ व लेखणी भेट देऊन गुरु बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली अध्यक्ष समारोपामध्ये मराठा मंडळाचे मुख्याध्यापक एम के पाटील सर यांनी गुरुचे महत्व सांगून 1988 सालच्या बॅच चे धन्यवाद मानले.

की दरवर्षी हे विद्यार्थी गुरुपौर्णिमेला येऊन शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात असेच विद्यार्थी आमच्या शाळेतून घडतील अशी आशा व्यक्त केली यावेळी तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*