शोभायात्रेची सुरुवात किल्ला येथील सम्राट अशोक चौकातून झाली तर सांगता कुमार गंधर्व रंगमंदिराजवळ करण्यात आली.
भक्त कनकदासांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे सुंदर चित्ररथ शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. तसेच धनगरी ढोल पथक आणि मोठ्या हलगीवर वादन करणाऱ्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेच्या अग्रभागी भक्त कनकदासांच्या वेशभूषेत सजलेली व्यक्ती चालत होती. ट्रॅक्टरवर ठेवलेली भक्त कनकदासांची भव्य मूर्ती आणि तिच्या मागोमाग चालणारी कलापथके हा दृश्य वैभवपूर्ण आणि भक्तिभावाने ओथंबलेला होता.
या शोभायात्रेत बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
Also read









